मालेगाव महानगरपालिका, मालेगाव

प्रभाग समिती कार्यालय क्र.

Phone : (02554) 255298, eMail: mlgmmc@gmail.com

जा.क्र./मामनपा/उत्सव परवानगी/प्रभाग क्र.//

दिनांक: --  

सार्वजनिक गणेशोत्सव तात्पुरते मंडप परवानगी पत्र

प्रती,

                        विषय:- सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणे कामी तात्पुरते मंडप उभारणे बाबत

संदर्भ :- 1) ऑनलाईन अर्जदाराचे अप्लिकेशन आय डी.क्र. , दिनांक: -- :
           2) शहर पोलीस ठाणे यांचेकडील ना हरकत दाखला पत्र जा. क्र. दि. --
           3) मालेगाव शहर वाहतूक शाखा पोलीस ठाणे यांचेकडील ना हरकत दाखला पत्र जा क्र. दि. --

 

             उपरोक्त विषयान्वये आपण आपल्या मंडळाचा गणेशोत्सव साजरा करणे कामी तात्पुरते मंडप उभारणी साठी परवानगी मिळणे बाबत या विभागाकडे अर्ज सादर केलेले आहे. अर्जाच्या अनुषंगाने या विभागाकडून संदर्भात नमूद केल्याप्रमाणे पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या ना हरकत दाखल्यांचा अधीन राहून आपल्या मंडळास सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणे कामी अर्जातील नमूद ठिकाणी x फुटाचा तात्पुरता मंडप उभारणेस खालील अटी शर्ती नुसार जागा वापराची परवानगी देण्यात येत आहे.
             आपणास देण्यात आलेली सदरची परवानगी हि गणेशोत्सव काळात मंडपाच्या दर्शनी भागात ठळक दिसेल या प्रमाणे लावण्यात यावी.

1)

सार्वजनिक गणेशोत्सव करिता संदर्भात नमूद महानगरपालिका व पोलीस प्रशासना कडील आदेशाच्या अधीन राहून मंडळास तात्पुरता मंडप उभारणे कामी दि. -- ते दि. -- या कालावधीसाठी परवानगी देण्यात येत असून सदरची परवानगी ही निश्चित केलेल्या ठिकाणीच वैध राहील.

2) म. मुंबई उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्र १७३ /२०१० मध्ये दिलेले आदेश तसेच महाराष्ट्र शासन, महानगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन, शहर वाहतूक शाखा यांनी दिलेले आदेश काटेकोर पालन करणे मंडळास बंधनकारक राहील.
3) सदर परवानगी पत्राची छायांकीत प्रत उत्सव कालावधीत मंडपाच्या दर्शनी भागात लावणे बंधनकारक राहील.
4) मंडळाच्या ठिकाणी निर्माल्य टाकण्यासाठी स्वतंत्र निर्माल्य कलश ठेवणे आवश्यक राहील.
5)

मंडळाच्या ठिकाणी लाईट तथा विद्युत रोषणाई बाबतच्या सुरक्षेची सर्व जबाबदारी ही संबंधित मंडळाची राहील मंडप उभारणे ते काढणे पर्येंत कोणताही अपघात झाल्यास त्यास महापलिका जबाबदार राहणार नाही.

6) मंडप उभारणेसाठी दिलेल्या मुदती नंतर मंडळाने मंडपाचा सर्व परिसर स्वच्छ करावा व मंडप उभारणी पूर्वी ज्या स्थितीत सदर जागा होती त्या स्थितीत १२ तासांच्या आत मोकळी करून देणे बंधनकारक राहील.
7) मंडपामुळे वाहतुकीची कोंडी होऊन रहदारीस अडथळा होणार नाही याची दक्षता द्यावी.
8) ध्वनी क्षेपकामुळे ध्वनी प्रदूषण होणार नाही याची दक्षता संबधित मंडळाची राहील.
9) सार्वजनिक उत्सवाकरिता आवश्यक विद्युत जोडणी महानगरपालिकेच्या रस्त्यावरील कोणत्याही विद्युत पथदिपामधून घेता येणार नाही. असे आढळून आल्यास संबधित मंडळावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
10) मंडपात अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करणे आवश्यक राहील.
11) वरील पैकी कोणत्याही अटी/शर्ती चे उल्लंघन झाल्यास दिलेली परवानगी रद्द करण्यात येऊन संबधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
12) देण्यात आलेली परवानगी कारण न देता रद्द करण्याचा अधिकार मालेगाव महानगरपालिकेचा राहील
13) स्थापन होणाऱ्या श्रींची मूर्तीची सर्वतोपरी सुरक्षीतता ठेवण्याची सर्वस्वी जबाबदारी ही मंडळ पदाधिकारी यांची राहील.
14) पोलीस प्रशासन, शहर वाहतूक शाखा यांनी दिलेली नाहरकत दाखल्यातील अटी/शर्तीची पालन करण्याची जबाबदारी मंडळाची राहील.
 
 

प्रभाग अधिकारी
प्रभाग क्र .
मालेगाव महानगरपालिका मालेगाव